डोणगावात महावितरणच्या पथकाची छापेमारी : 30 ठिकाणी विद्युत तारेवर आकोडे टाकून वीज चोरी पकडली


यावल (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील डोणगाव येथे महावितरणच्या पथकाने वीज चोरीविरूध्द धडक मोहिम राबवली. यात गावात 30 ठिकाणी कारवाई करीत विद्युत तारेवर आकोडे टाकुन वीज चोरी पकडण्यात आली. संबंधीत वीज चोरी करणार्‍यांना समज देवून रितसर कनेक्शन घेण्याची नोटीस बजावण्यात आली व आकोडे जप्त करण्यात आले.

अचानक केली कारवाई
डोणगाव, ता.यावल येथे महावितरणच्या पथकाने वीज चोरी विरोधात धडक मोहीम राबवत तब्बल 30 घरांमधील थेट वीज वाहिनीवर आकडे आकडे टाकून अनधिकृत पणे वीज चोरी करणार्‍या घरांवरील आकडे हटवण्यात आले व कार्यवाही करून अनधिकृत केबल वायरी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अचानक झालेल्या कार्यवाहीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.







डोणगाव परिसरात अनेक घरांमध्ये अधिकृत वीज जोडणी न घेता थेट वीज वाहिनीचर आकोडे टाकून वीज वापरली जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर डांभूर्णी कक्षातील महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी यावल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी मोहीम राबविली. त्यात पथकाने डोणगाव गावातील विविध भागांची तपासणी करून अनधिकृत वीज जोडाण्या शोधून काढल्या.

अनधिकृत आकडे काढून जप्त करण्यात आले तसेच संबंधित व्यक्तींना महावितरण कंपनीच्या नियमानुसार वीज कनेक्शन घेण्याची सूचना देखील देण्यात आल्या. ही कार्यवाही दर दिवशी चालू राहणार आहे, अशी माहिती डांभूर्णी कक्षातील कनिष्ठ अभियंता राहुल निकम यांनी दिली.

उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष प्रमुख राहुल निकम, डांभूर्णी कक्षाचे कर्मचारी लाईनमन दिनेशसिंग पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ गिरीश बर्‍हाटे, वरिष्ठ तंत्रज्ञ विष्णू येशी, बाह्य स्त्रोत कर्मचारी जयेश बेंडाळे, भूषण साळुंखे, सुयोग कोळंबे व इतर सर्व कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !