दिवाळीत रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : भुसावळ-देवळाली दरम्यान विशेष अनारक्षित मेमू 10 व 11 रोजी धावणार


भुसावळ (शनिवार, 7 नोव्हेंबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तसेच प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भुसावळ आणि देवळाली दरम्यान विशेष मेमू अनारक्षित रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

10 व 11 रोजी धावणार विशेष मेमू
01226 विशेष अनारक्षित दिनांक 10 व 11 रोजी भुसावळ येथून सकाळी 9.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी देवळाली येथे दुपारी 1.5 वाजता पोहचेल.









01225 विशेष अनारक्षित दिनांक 10 व 11 रोजी देवळाली येथून 1.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भुसावळ येथे दुपारी पाच वाजता पोहचेल. या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, नाशिक रोड आणि देवळाली येथे थांबा देण्यात आला आहे.

या विशेष मेमू रेल्वेगाडीमुळे दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त प्रवास करणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रित करण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !