भुसावळातील प्रभाग क्रमांक 25 मधील सफाई कर्मचार्‍यांचा गौरव ; नगरसेविका डॉ.छाया देशमुख यांचा उपक्रम


भुसावळ (रविवार, 8 नोव्हेंबर 2026) : शहरातील प्रभाग क्रमांक 25 मधील स्वच्छता आणि परिसराच्या सुंदरतेसाठी अहोरात्र मेहनत घेणार्‍या आपल्या सफाई कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत प्रभागाच्या नगरसेविका डॉ.छाया फालक देशमुख यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सर्व सफाई कर्मचार्‍यांना दिवाळीची भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.

कर्मचार्‍यांच्या मेहनतीमुळेच प्रभाग स्वच्छ
आपल्या प्रभागातील रस्ते, गल्ल्या, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हे कर्मचारी दररोज मेहनत घेत असतात. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, परिसरात स्वच्छता राखण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ते प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यांच्या या मेहनतीमुळेच आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होते. स्वच्छता कर्मचार्‍यांचे योगदान हे प्रभागाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवणे, त्यांना सन्मान देणे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही आपली जबाबदारी असल्याचे डॉ.छाया देशमुख यांनी यावेळी सांगिते. याच भावनेतून नगरसेविका डॉ. छाया फालक देशमुख यांनी सफाई कर्मचार्‍यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवण्याचा छोटासा प्रयत्न केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !