यावल शहरातील 45 वर्षीय प्रौढाची आत्महत्या


यावल (रविवार, 8 नोव्हेंबर 206) : यावल शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या महाराणा प्रताप नगरातील 45 वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरी साडीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नीळकंठ उर्फ बापू सोनू कोळी (45) असे मृताचे नाव आहे.

काय घडले यावल शहरात ?
यावल शहरात चोपडा रस्त्यालगत महाराणा प्रताप नगरातील रहिवासी निळकंठ उर्फ बापू सोनू कोळी (45) हे घरी असताना शनिवारी रात्री त्यांनी आपल्या राहत्या घरी छताला साडी बांधून गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना तातडीने तेथून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनील पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !