भुसावळातील बियाणी परिवाराची दिवाळी आणि लक्ष्मीपूजन उत्साहात

कर्मचार्‍यांना भेटवस्तूंचे वाटप : फटाक्यांची भव्य आतषबाजी


भुसावळ (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026) : शहरातील प्रसिद्ध स्थानिक उद्योगपती ‘बियाणी ग्रुप’ने रविवारी दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात, भक्तीभावाने आणि आनंदाने साजरा केला. या शुभप्रसंगी, बियाणी ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी आणि डॉ. संगीता बियाणी यांनी विधी आणि वैदिक मंत्रोच्चारांसह देवी लक्ष्मीची पूजा करीत सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

कर्मचार्‍यांना भेटवस्तूचे वाटप
स्मिता बियाणी आणि डॉ.खुशी बियाणी यांनी ग्रुपच्या वाहनांची पारंपरिक पूजा केली. कर्मचार्‍यांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही बियाणी ग्रुपने आपली परंपरा जपली आणि सर्व सदस्य व कर्मचार्‍यांसोबत आनंद वाटून घेतला. अभियंता रौनक बियाणी आणि डॉ.आयुषी बियाणी यांनी बियाणी ग्रुपच्या सर्व सदस्यांना, अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या. व्यवस्थापनाकडून मिळालेल्या या प्रेमामुळे आणि आदरामुळे कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.









परिवारातील सदस्यांची उपस्थिती
दीपोत्सव कार्यक्रमात बियाणी ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, अभियंता रौनक बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी, डॉ.आयुषी बियाणी, अभियंता मनीष बियाणी, डॉ.खुशी बियाणी, कांताबाई बियाणी यांच्यासह संपूर्ण बियाणी कुटुंब उपस्थित होते. त्यांच्या सोबत बियाणी ग्रुपचे व्यवस्थापक गोपाल ठाकूर, राजेश पारीक, प्राचार्य डी.एम.पाटील, राजू मोरे, सुनील पिहुल, सुनील महाजन, गुणवंत महाजन, सलीम पठाण, आदित्य तायडे, जितेंद्र वारके, हर्षल धुंडले व तेजस अट्रावलकर यांच्यासह समुहातील सर्व विभागातील कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मी पूजनानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !