भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु जयंती उत्साहात
भुसावळ (रविवार, 15 नोव्हेंबर 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शनिवार, 14 रोजी पंडित जवाहरलाल नेहरु जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑननरी जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे यांच्याहस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी बालदिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण केले. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व चॉकलेट देण्यात आले. मुले हे देशाचे भविष्य व देशाचे आधारस्तंभ आहे. शेती, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण यांच्या विकासावर नेहरूजींनी भर दिला, अशी माहिती शाळेतील शिक्षिका वंदना कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी होते.
