रेल्वे प्रवाशांना दिलासा : दिवाळी व छठ सण विशेष गाड्यांच्या फेर्यांना मुदतवाढ
भुसावळ (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक 01079 मुंबई-गोरखपूर विशेष ही गाडी 16 नोव्हेंबर पर्यंत अधिसूचित करण्यात आली मात्र आता या गाडीच्या परिचालनास दिनांक 20 नोव्हेंबरपर्यंत 2026 या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 01080 गोरखपूर-मुंबई विशेष ही गाडी यापूर्वी 18 नोव्हेंबरपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती. आता या गाडीच्या परिचालनास दिनांक 22 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 01447 पुणे-दानापूर विशेष या गाडीच्या परिचालनास दिनांक 22 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 01448 दानापूर-हडपसर विशेष या गाडीच्या परिचालनास दिनांक 24 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 01029 लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर विशेषची एक अतिरिक्त फेरी 20 नोव्हेंबर रोजी तर गाडी क्रमांक 01030 दानापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेषची एक अतिरिक्त फेरी 22 नोव्हेंबर रोजी चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 01041 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेषची एक अतिरिक्त फेरी दिनांक 19 रोजी तर गाडी क्रमांक 01042 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेषची एक अतिरिक्त फेरी 21 नोव्हेंबर चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 01021 लोकमान्य टिळक टर्मिनस-रक्सौल विशेषची एक अतिरिक्त फेरी दिनांक 21 रोजी तर गाडी क्रमांक 01022 रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेषची एक अतिरिक्त फेरी 24 नोव्हेंबर रोजी चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 01457 हडपसर-गोरखपूर विशेषची एक अतिरिक्त फेरी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी तर गाडी क्रमांक 01458 गोरखपूर-हडपसर विशेषची एक अतिरिक्त फेरी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी चालविण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या विशेष गाड्यांच्या विस्तारित परिचालनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. प्रवासापूर्वी आपल्या तिकिटाची उपलब्धता व स्थिती अवश्य तपासून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
