न्हावीत लग्नास नकार दिल्याच्या रागातून एकावर चाकूहल्ला
यावल (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील न्हावी या गावात हॉटेल एकांत गौरव समोर लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून वाद होत एका 45 वर्षीय इसमाला शिविगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच धारदार चाकूने पोटावर वार करून जबर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले न्हावीत ?
न्हावी गावात हॉटेल एकांत गौरव आहे. येथे लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून वाद होत समशेर उर्फ संजय सरदार तडवी (45) यांना आणि ईस्माईल तडवी व जुम्मा हैदर तडवी तसेच त्यांच्यासोबत इतर त्यांचे दोन मित्रांनी शिविगाळ करून मारहाण केली तसेच धारदार चाकूने वार करून त्यांना जबर दुखापत केली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरिक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार सुपडा पाटील करीत आहे.
