जळगावातील अनुभूतीमध्ये रविवारपासून विशेष ‘संडे स्कूल’ उपक्रम


जळगाव (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने 22 नोव्हेंबर 2026 पासून 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेष ’संडे स्कूल’ आयोजित केली आहे. दर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत जैन डिव्हाइन पार्क येथे हा उपक्रम चालेल.

या संडे स्कूलमध्ये मुले निसर्ग सहल, विज्ञानाचे रंजक प्रयोग, चित्रकला, गोष्टी, नाट्य आणि भारतीय संस्कृतीचा आनंद घेतील. तसेच योग, नृत्य, गणिती खेळ आणि सुसंस्कारांच्या माध्यमातून आनंददायी शिक्षणाचा अनुभव मुलांना दिला जाईल. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये जिज्ञासा, आत्मविश्वास, कल्पकता व सहकार्याची भावना विकसित केली जाईल. अधिक माहितीसाठी 9422771458 किंवा 7990925514 या क्रमांकांवर संपर्क साधावा.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !