भुसावळात उद्या समर्पण गौरव ग्रंथाचे प्रकाशन


भुसावळ- शहरातील शैक्षणिक व सामाजिक चळवळ असलेल्या ज्ञानासह मनोरंजन ग्रुपतर्फे ‘समर्पण’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन गुरूवार, 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच वाजता भुसावळ हायस्कूलमध्ये करण्यात येणार आहे. रावेर तालुक्यातील खिर्डी येथील दि आर.ई.एस.हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक बी.आर.पाटील यांनी आपल्या सत्तावीस वर्षांच्या मुख्याध्यापकपदाच्या सेवाकाळात केलेले उल्लेखनीय कार्य आणि सेवानिवृत्तीनंतर केलेले शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक यासह विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन ग्रुपतर्फे समर्पण हा गौरव ग्रंथ तयार करण्यात आला आहे. या गौरव ग्रंथाचे प्रकाशन गुरूवारी सायंकाळी पाच वाजता भुसावळ हायस्कूलमध्ये होत मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी बी.आर.पाटील यांना मानपत्र प्रदानदेखील करण्यात येईल. उपस्थितीचे आवाहन ज्ञानासह मनोरंजन ग्रुपप्रमुख डॉ.जगदीश पाटील यांच्यासह ग्रुप सदस्यांनी केले आहे.


कॉपी करू नका.