यावलमध्ये वीज बिलाची रक्कम मागितल्यावरून मारहाण : तिघांविरुद्ध गुन्हा


यावल : आझादनगर परीसरात विज बिलाची रक्कम मागण्याच्या कारणावरून एका व्यक्तीस तीन जणांनी जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
यावल शहरातील आझादनगर परीसरातील रहिवासी गनी अकबर पटेल (60) यांच्याकडून शोभाबाई बाबुलाल पारधे यांनी घरगुती वापरासाठी वीजपुरवठा घेतला होता. याच संदर्भात 17 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी गनी अकबर पटेल यांनी पारधे यांना वापरलेल्या वीज बिलाची रक्कम मागिल्याच्या कारणावरून वाद उफाळला व गनी पटेल आणि त्यांचे मुले कय्युम गनी पटेल आणि नय्युम गनी पटेल यांनी फिर्यादी शोभाबाई बाबुलाल पारधे यांचा मुलगा प्रल्हाद बाबुलाल पारधे यास चापटा-बुक्क्याने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली व काठीने डोक्यास मारून दुखापत केली. या प्रकरणी शोभाबाई बाबुलाल पारधे यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी गनी अकबर पटेल, कय्युम गनी पटेल व नय्युम गनी पटेल (आझादनगर, यावल) यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आल. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !