कोरोना : जळगाव जिल्ह्यात पुन्हा 304 बाधीत आढळले


जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 7796 वर

जळगाव : जिल्ह्यात रविवारी पुन्हा 304 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 7796 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यातील दहा बाधीतांचा मृत्यू झाला असून आजवर 391 रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 107
जळगाव ग्रामीण 15
भुसावळ 19
अमळनेर 10
चोपडा 16
पाचोरा 21
भडगाव 05
धरणगाव 18
यावल 06
एरंडोल 04
जामनेर 21
रावेर 29
पारोळा 05
चाळीसगाव 15
मुक्ताईनगर 09
बोदवड 04
अन्य जिल्हा 00

एका दिवसात 10 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 10 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चार मृत्यू शासकीय वैद्यकीय रुग्णालयात, तीन मृत्यू डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये, दोन पाचोरा येथे तर एका रुग्णाचा गोल्डसिटी रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये 48 व 76 वर्षीय पुरूष, चाळीसगाव तालुक्यातील 65 पुरूषासह 70 वर्षीय महिला, रावेर तालुक्यातील 55 व 73 वर्षीय पुरूष, जामनेर तालुक्यातील 72 वर्षीय पुरूष, पाचोरा तालुक्यातील 40 वर्षीय पुरूष, अमळनेर तालुक्यातील 78 वर्षीय पुरूष व भडगाव तालुक्यातील 62 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !