जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 208 रुग्ण आढळले


जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 8004 वर

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा 208 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 8004 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यातील 9 बाधीतांचा मृत्यू झाला असून आजवर 400 रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 68
जळगाव ग्रामीण 04
भुसावळ 10
अमळनेर 34
चोपडा 00
पाचोरा 08
भडगाव 06
धरणगाव 03
यावल 03
एरंडोल 08
जामनेर 23
रावेर 01
पारोळा 28
चाळीसगाव 11
मुक्ताईनगर 01
बोदवड 00
अन्य जिल्हा 00




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !