सावद्यातील रॅक पॉईंटची खासदार रक्षा खडसेंनी केली पाहणी


सावदा : सावदा माल धक्क्यावर उभारण्यात आलेल्या खतांच्या रॅक पॉईंटची सोमवारी दुपारी चार वाजता खासदार रक्षा खडसे यांनी पाहणी केली. यावेळी रेल्वे अधिकारी उपस्थित होते

खासदारांना दिले निवेदन
यावेळी रावेर तालुका अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशन तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी खासदार खडसे यांना निवेदन दिले. यात त्यांनी जळगाव येथील खत रॅक माल धक्यावरील सात हमालांना कोरोना झाल्याने खते ही जिल्ह्यातील इतर ठिकाणी उतरविन्यात येत असल्याने व पुन्हा मुक्ताईनगरसह इतर ठिकाणी खते आणताना मोठा खर्च लागत असल्याने सावदासह निंभोरा व रावेर येथील केळी माल धक्के असलेल्या ठिकाणी खतांचा रॅक पॉईंट सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.

खासदारांच्या प्रयत्नांना आले यश
रावेर, मुक्ताईनगर, यावल, बोदवड, भुसावळ या तालुक्यातील कृषी केंद्र मालक व खते विक्री व्यापारी संघाच्या सदस्यांनी खासदार रक्षा खडसे यांची 11 जुलै रोजी भेट घेत या पाच तालुक्यांना खते घेताना जळगाववरून वाहतुकीसाठी अतिरिक्त खर्च लागत असल्याची बाब सांगितली होती. सावदा रेल्वे स्थानकावर खतांचा रॅक खाली करण्यासाठी थांबा रेल्वेने उपलब्ध करून दिल्यास वाहतुकीसाठी लागणारा अतिरीरक्त वेळ व खर्चाची बचत होईल याबाबत चर्चाही करण्यात आली होती. त्यानंतर खासदारांनी 11 जुलै रोजी भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम यांच्याशी पत्रव्यवहार करून सावदा येथे खतांच्या रॅकसाठी थांबा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या होत्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !