भुसावळातील चोरीचा उलगडा : दोघा आरोपींना अटक
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून कामगिरी : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
भुसावळ : मॉडर्न रोडवरील टपाल कार्यालयालगत असलेले हरी ओम इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील सुमारे अडीच लाखांच्या चोरी प्रकरणी फिरोज शेख अकिल गवळी (24, रा.जममोहल्ला, मशीदजवळ भुसावळ) व रज्जाक उर्फ राजा शेख रहीम (28 रा.जाम मोहल्ला, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोडख बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, नाईक रमण सुरळकर, रवींद्र बिर्हाडे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, कृष्णा देशमुख आदींनी केली.

