‘कडकनाथ’ व्यवसायाच्या आमिषातून शेतकर्‍यांना सव्वा कोटींचा गंडा


मुक्ताईनगर : ईमुपालन कंपनीने शेतकर्‍यांना चुना लावल्यानंतर आता दुसर्‍या एक कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनातून मालामाल करण्याचे आमिष दाखवत जिल्ह्यातील 70 शेतकर्‍यांना सव्वादोन कोटींचा गंडा घातला आहे. मानवी शरीरासाठी उपयुक्त असलेल्या कडकनाथ कोंबडी पालनासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये उकळण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. 75 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत 300 पक्षी, खाद्य, औषधे, खाद्याची भांडी घ्या आणि अवघ्या 10 महिन्यात किमान दोन लाख 75 हजार रुपये तर 1 लाख 20 हजार गुंतवून 360 मिळवा, अशी योजना आखून तिचा प्रसार करण्यात आला. जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी ‘कडकनाथ’च्या जाळ्यात फसले. जुलै 2018 पासून कडकनाथच्या कंपनीने जिल्ह्यात पाय ठेवला आणि वर्षभरात सुमारे 70 शेतकर्‍यांनी या शेतीपूरक उद्योगात कडकनाथचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या वर्षभरात कंपनीने गाशा गुंडाळल्याचे चित्र आहे.


कॉपी करू नका.