लाखाची बुलेट चोरली ; साकेगावातील आरोपी जाळ्यात
जळगाव- सुरत येथे मामांकडे आलेल्या भाच्याने पार्किंगमधून लाखाची बुलेट लांबवत साकेगाव गाठले. वर्षभर बुलेटवरून रपेट मारताना एलसीबीला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीच्या शुक्रवारी मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीने सुरतमधील समीमेर हॉस्पिटल येथून 10 ऑगस्ट 2018 रोजी बुलेट चोरल्याची कबूली दिली. योगेश संजय गाडीकर (23, साकेगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गुजरात राज्यातील वराढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने आरोपीला पुढील कारवाईसाठी तेथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांच्या पथकाने केली कारवाई
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम सुरज पाटील, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजयसिंग पाटील, सुनील दामोदरे, युनूस शेख, कमलाकर बागुल, सुरज पाटील, गफूर तडवी, इद्रिस पठाण, प्रवीण हिवराळे आदींच्या पथकाने आरोपीच्या शुक्रवारी साकेगावातून मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपी सुरत येथे मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेत असताना त्याने तेथून बुलेट लांबवल्याची माहिती सूत्रांनी दिली.