इलेक्टॉनिक मतदान यंत्रावर १ सप्टेंबर रोजी अभिरूप मतदान
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीनी उपस्थित रहावे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे
जळगाव : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जळगाव जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या तसेच प्राप्त झालेल्या इलेक्टॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी अंतिम टप्यात असून या अंतर्गत 1 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेदरम्यान अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अभिरूप मतदान करतेवेळी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित ठेवण्याबाबत सुचित केल्यानुसार जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक 2019 चे उपलब्ध तसेच प्राप्त झालेल्या ईव्हीएम मशीनपैकी 5 टक्के मशीनवर पाचशे, एक हजार आणि 1200 याप्रमाणे मतदान करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अभिरुप मतदान (Mock Poll) करतेवेळी दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10:00 वाजता तहसिल कार्यालय, भुसावळ येथील आवारातील शासकीय धान्य गोदाम येथे पाहणी करणेकामी ओळखपत्रासह उपस्थित राहता येईल. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Attachments area