भुसावळचे आमदार संजय सावकारेंंनाही कोरोनाची लागण


संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन

भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार सावकारे यांनी अँन्टीजन टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर ते गोदावरी रुग्णालयात सोमवारी उपचारार्थ दाखल झाले आहेत. अ‍ॅन्टीजन टेस्ट पॉझीटीव्ह आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपापली कोरोना चाचणी करून घ्यावी व घाबरून जाण्याचे कारण नाही निश्‍चितपणे आजारावर मात करता येते, असेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !