साकळीत चौघांची पाच जणांना मारहाण
यावल (मंगळवार 8 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील साकळीत किरकोळ कारणावरून एका कुटुंबातील पाच जणांना चार जणांनी शिविगाळ करीत लाकडी काठीने डोक्यात मारून दुखापत केली व ठार मारण्याची धमकी दिली. यावल पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे मारहाण प्रकरण
साकळी गावातील लोधी वाडा भागात किरकोळ कारणावरून वाद झाला व या वादातून कविता संजय लोधी, दिनेश संजय लोधी, राहुल संजय लोधी व संजय पुनमचंद लोधी या चार जणांनी फिर्यादी सपना रवींद्र लोधी (42) यांना तसेच त्यांच्या सासू चमेलाबाई लक्ष्मण लोधी, पुतण्या ज्ञानेश्वर दीपक लोधी, मुलगा मयूर रवींद्र लोधी, व दिर गोविंदा लक्ष्मण लोधी अशा पाच जणांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि लाकडी काठीने मारून दुखापत केली व ठार मारण्याची धमकी देण्यात आली.

याप्रकरणी यावल पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोहील गणेश करीत आहे.-

