मुक्ताईनगर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू
मुक्ताईनगर (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : हृदयविकारासह पूर्णा नदीच्या बॅक वॉटरमध्ये बुडून तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुक्ताईनपगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पहिल्या घटनेत सुभाष राणे (40, कोथळी, ता.मुक्ताईनगर) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे हलवण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दुसर्या घटनेत मनोज अंबादास मोरे (41, शिरपूर, मूळ रहिवासी साकरी, ता.भुसावळ) यांना 3 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत्यूचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.
तिसर्या घटनेत माणेगाव, ता.मुक्ताईनगर येथील चंद्रकांत भास्कर सपकाळे (45) यांचा पूर्णा नदीच्या बॅकवॉटरमध्ये बुडाल्याने मृत्यू झाला. मृताच्या भावाने या प्रकरणी दिलेल्या खबरीनुसार माणेगाव गावाला लागून असलेल्या पूर्णा नदीच्या बॅक वॉटरमध्ये त्यांच्या भावाचा बुडून मृत्यू झाला.
तपास पोलीस निरीक्षक आशिक अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप वानखेडे व हवालदार राजेश चव्हाण करीत आहेत.

