भुसावळ भाजपाचे शहराध्यक्ष दिनेश नेमाडे कोरोनाबाधीत


कुटुंबातील पत्नीसह वडिलांनाही कोरोनाची लागण

भुसावळ : शहरात कोरोना रुग्णांची सातत्याने संख्या वाढत असून सर्वसामान्य नागरीकांसह भुसावळचे आमदार संजय सावकारे तसेच भुसावळ भाजपाचे शहराध्यक्ष दिनेश अरुण नेमाडे, त्यांच्या पत्नी तसेच त्यांचे वडील अरुण नेमाडे यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर ट्रामा केअर सेंटरसह रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लक्षणे जाणवल्यास चाचणी करा : दिनेश नेमाडे
भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वडिल अरुण नेमाडे यांना व्हायरल निमोनिया झाल्यानंतर मी माझी व पत्नी आरतीची कोरोना टेस्ट लागलीच करून घेतल्यानंतर तिघांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 13 सप्टेंबर रोजी वडिल अरुण नेमाडे यांना भुसावळच्या रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे शिवाय माझ्यासह पत्नी आरती भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहोत. आम्हाला खोकला व तापाचा त्रास सुरूवातीला जाणवला आता मात्र आमची प्रकृती स्थिर आहे. कोरोनाला विनाकारण नागरीकांनी घाबरून न जाता त्रास झाल्यानंतर चाचणी करून घ्यावी मात्र लोक आजाराला घाबरून चाचणी करीत नसल्याने फैलाव वाढत आहे. नागरीक कोरोना टेस्ट न करता थेट उपचार करण्यावर भर देत आहेत मात्र कोरोना चाचणी करणे समाज व परीवाराच्या हिताची ही बाब असल्याचे ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !