जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 878 रुग्ण आढळले
24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत 40 हजार 165 रुग्णांना कोरोनाची लागण
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 878 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 40 हजार 165 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 29 हजार 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत 1008 रुग्णांचा कोरानामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंगळवारी एकाच दिवशी 707 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 150
जळगाव ग्रामीण 49
भुसावळ 51
अमळनेर 126
चोपडा 124
पाचोरा 37
भडगाव 35
धरणगाव 48
यावल 19
एरंडोल 34
जामनेर 56
रावेर 22
पारोळा 34
चाळीसगाव 25
मुक्ताईनगर 19
बोदवड 40
अन्य जिल्हा 09


