खडसेंना राजकारण कळते, ते योग्यच निर्णय घेतील


माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचा सूचक संदेश

जामनेर : माजी मंत्री एकनाथ खडसेंना राजकारण चांगले कळत असल्याने ते ‘योग्य’ तो निर्णय घेतील, असे सूचक विधान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. जामनेर येथे आमदार गिरीश महाजन यांच्या जी.एम.फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या हॉस्पीटल शुभारंभासाठी फडवणीस आले असता प्रसिद्धी माध्यमांशी त्यांच्याशी संवाद साधला.

खडसेंनी कार्यक्रमास फिरवली पाठ
फडणवीस व खडसे यांच्यातील सख्य महाराष्ट्राला ठावूक असतानाच अलिकडे दोघांमध्ये शाब्दीक युद्ध चांगलेच रंगल होते. या पार्श्‍वभूमीवर खडसे या कार्यक्रमास जातात की नाही? याकडे लक्ष लागले असताना खडसे यांनीकार्यक्रमास जाणे टाळले. खासदार रक्षा खडसे व मुक्ताईनगर भाजपचे पदाधिकारी या कार्यक्रमा मात्र उपस्थित होते. दरम्यान, एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार होतील आणि लवकरच मंत्री होतील, असा दावा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केल्याने खडसे हे राष्ट्रवादीत जातील, असे मानले जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !