ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन अभ्यासवर्ग


भुसावळ : ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव जिल्हा नाशिक विभाग यांच्यातर्फे गुरुवार 15 ते 22 ऑक्टोबरपर्यंत फेस बुक व यू ट्यूब च्या माध्यमातून ऑन लाईन अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. हा वर्ग दररोज दुपारी 4 त े5.30. या वेळेत होईल. याा वर्गाचे उद्घाटन ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक विभाग अध्यक्ष बाबा जोशी करतील व राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड अध्यक्षस्थानी असतील. जास्तीत-जास्त ग्राहकांनी या वर्गाचा लाभ घ्यावा. विविध दैनंदिन व्यवहारात येणार्‍या अडी अडचणी, समस्या, आपण कसे फसवल्या जातो, लुबाडले जातो, यावर कायदेशीर उपाय काय हे सर्व या अभ्यास वर्गातून होईल. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष मनोज जैन आणि सर्व कार्यकाारीणी सदस्यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !