जळगावात विनापरवाना दारूची वाहतूक ; मुद्देमालासह कार चालकास अटक


जळगाव : विना परवाना देशी-विदेशी दारूची कारमधून वाहतूक करणार्‍या कार चालकाला मुद्देमालासह एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातील मुद्देमाल व कार हस्तगत करण्यात आली. एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील हॉटेल कस्तूरीजवळ कारमधून बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली. गुप्त माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एमएच 02 जेपी 0071) मधील कार चालक संशयास्पदरित्या हालचाली करत असतांना दिसून आला. वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डीक्कीतून 12 हजार 480 रूपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली. कारचालक राजेंद्र पुंडलिक चांदेकर (वय-56, रा. सुतार गल्ली, तोंडापूर ता.जामनेर) याला अटक केली असून कारसह देशी विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस कॉस्टेबल विजय बावस्कर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.कॉ. सचिन पाटील, योगेश बारी, विजय बावस्कर यांनी कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !