माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंवर शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त वही तुलासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुक्ताईनगर : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला तर वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सोमवारी सकाळपासूनच मुक्ताईनगरातील फार्महाऊसवर खडसे यांनी चाहत्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. सोमवारी सकाळी फार्महाऊसवर तालुका एज्युकेशन सोसायटीतर्फे आमदार खडसे यांची वही तुला करण्यात आली.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुक्ताईनगर भाजप कार्यालयाजवळ खडसेंचे स्वागत करण्यात आले. नगरपंचायतीकडून लाडू तुला व तालुका भाजप, भाजयुमोकडून केक कापण्यात आला. यानंतर पंचायत समितीकडून वहितुला करण्यात आली. सकाळी 11 वाजता खडसे यांनी कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर दिवसभर कोथळी येथील मुक्ताई निवासस्थानी थांबून मतदार संघ व जिल्हाभरातून आलेले पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, प्रभारी सभापती प्रल्हाद जंगले, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.