मोबाईल चोरटा लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : मध्यप्रदेशातील कटनी येथील रेल्वे प्रवाशाचा रेल्वे प्रवासात मोबाईल चोरी झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी चिनावल येथील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. गौतम अशोक भालेराव (चिनावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. झाले असे की, तक्रारदार कन्हैयालाल गुंमन मल (40, माधव नगर, कटनी, मध्यप्रदेश) हे 14 मार्च 2020 रोजी गाडी क्रमांक 13202 च्या कोच क्रमांक एस- 1 च्या बर्थ क्रमांक 18 वरून मनमाड ते कटनी प्रवास करीत असताना भुसावळ स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर चोरट्याने दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस हवालदार संजीवनी तारगे यांनी केल्यानंतर गौतम अशोक भालेराव (चिनावल) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला. ही कारवाई लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजीवनी तारगे, सहाय्यक फौजदार किशोर बढे, पोलीस कॉन्स्टेबल विजय यादव आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !