यावलमधील तरुणाचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू


यावल : शहरातील शिवाजी नगर झोपडपट्टी परीसरातील रहिवासी एका 32 वर्षीय तरूणाचा तापी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. रामधन पुंजो बेलदार असे या तरुणाचे नाव आहे. बेलदार हा तरुण बुधवारी भालशीव जवळील तापी पात्रात बुडाल्याने बेपत्ता झाला मात्र गुरूवारी त्याचा मृतदेह आढळला. भालशिव, ता.यावल जवळील तापी नदीपात्रात बुधवारी उत्तरकार्याचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमात यावल शहरातील शिवाजीनगर झोपडपट्टी भागातील रहिवासी रामधन पुंजो बेलदार हा तरूण गेला असता पाय घसरल्याने तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला. बुधवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही तर गुरुवारी त्याचा मृतदेह आढळला. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !