यावलमध्ये ट्रॅव्हल्स बसच्या टपावरून पडल्याने एकाचा मृत्यू
यावल : ट्रॅव्हल्स बसच्या टपावरून तोल जावून पडल्याने 49 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची गुरुवारी गुरुवारी दुपारी चार वाजता घडली. राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी असे मयताचे नाव आहे. शहरातील जनता बँकेच्या मागील बाजुस असलेल्या बारी वाड्यातील रहिवासी राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी (49) हे दररोज यावलमधून धावणार्या साईराम ट्रॅव्हल्सच्या बसेसव्दारे केळीचे पानं पुणे पाठवण्याचा व्यवसाय करतात. गुरूवारी चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपावर ट्रॅव्हल्स (एम.एच. 19 वाय. 6111) उभी असताना तिच्या टपावर चढून कॅरीवर बारी हे केळीचे पानाचे गठ्ठे बांधत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले व त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिसात ट्रूव्हल्स चालक तेजस लहू पाटील (रा.अमळनेर) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत बारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परीवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार असलम खान करीत आहे.

