राष्ट्रीय दलित पँथरच्या युवा उपाध्यक्षपदी लोकेश सपकाळे
भुसावळ : राष्ट्रीय दलित पँथरच्या युवा उपाध्यक्षपदी लोकेश दिलीप सपकाळे यांची निवड करण्यात आली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सोशल डिस्टन्सचे पालन करून सपकाळे यांचा पदाधिकार्यांनी गौरव केला. राष्ट्रीय दलित पँथर संटघनेची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवीत तसेच संघटनेच्या उद्दिष्टांना बाधा आणणारे कार्य करू नये, असे नियुक्तीपत्रात नमूद आहे. याप्रसंगी राष्ट्रीय दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे, उपाध्यक्ष अल्केश मोरे, भुसावळ युवा शहराध्यक्ष राजू तायडे, शहर उपाध्यक्ष सुनील रायमळे, शहराध्यक्ष शांताराम नरवाडे, जिल्हा संटघक भीमराव वाघ, लक्ष्मण सरदार आदी उपस्थित होते.

