मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 11 कोटींच्या रस्ता कामांना मंजुरी


आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश

खिर्डी : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून 11 कोटींच्या रस्ता कामांना मंजुरी मिळाली आहे. रस्त्यांच्या कामांमुळे ग्रामीण भागातील जनतेची मोठी सोय होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित व दुरवस्था झालेल्या रस्त्यांबाबत कामांबाबत आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कामे होण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री महसनज मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मंजूर रस्त्यांमध्ये प्रजिमा 14 (ऐनपूर)-सुलवाडी- कोळोदा रस्ता, खिर्डी-रेंभोटा रस्ता तसेच प्रजिमा 270 निमखेडे ते चिंचखेडा सीम रस्ता, ता.बोदवड रस्त्याचा समावेश आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !