भुसावळातील तरुणाचा खून : पाचवा आरोपी अटकेत
भुसावळ : जुन्या वादातून शहरातील पंचशील नगरातील मोहंमद कैफ या तरुणाचा डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून करण्यात आल्याची घटना रविवार, 11 ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी पाचव्या पसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. खूनातील आरोपींची ओळखपरेड बाकी असल्याने पोलिस कोठडीचा हक्क राखत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या खून प्रकरणी आता ओळख परेड होणार आहे. यापूर्वी अटकेतील असलेल्या धम्म प्रिय उर्फ धम्मा मनोहर सुरळकर (18), समीर उर्फ कल्लू अजय बांगर (18), शुभम पंडित खंडेराव (21) व अश्विन उर्फ गोलू अजय बांगर (21, सर्व रा.पंचशील नगर, भुसावळ) यांच्याकडून हल्यात वापरलेला रॉड पोलिसांनी जप्त केला. अटकेतील चौघा आरोपींची पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

