साकेगावात परप्रांतीय मजुराची गळफास घेवून आत्महत्या
भुसावळ : सेंधवा जिल्ह्यातील पाळसा येथील रहिवासी व पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील साकेगावात आलेल्या जलराम रेमसिंग बारेला (25) या तरुण मजुराने गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दूध घेण्यासाठी जातो, असे सांगून जलराम बारेला हे बाहेर पडले ते परत न आल्याने त्याच्या काकांनी शोध घेतला असता त्याचा मृतदेह शेतात झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

