राष्ट्रवादी प्रवेशावर माजी मंत्री खडसे म्हणाले, नो कॉमेंटस् !
जळगाव : भाजपचे माजी महसूलमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात असल्याच्या चर्चा जोरदार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी खडसे हे जळगावच्या ‘मुक्ताई’ बंगल्यावर आल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी खडसे यांनी आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त माध्यमांनी ठरवल्याचे सांगत या विषयावर नो कॉमेंटस् म्हणून बोलणे टाळले. खडसेंच्या या भूमिकेने ते आता राष्ट्रवादीत जाणार की नाही? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
