भुसावळात पोलिसांचे दमदार पथसंचलन
भुसावळ- गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी म्हणून भुसावळ येथे आज पोलिसांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पथसंचलन केले. अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड,भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, भुसावळ शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पथसंचलनाची सुरुवात भुसावळ शहर पोलीस ठाण्यापासून झाली. गांधी पुतळा, जळगाव रो, दशमेश मार्ग, घासीलाल चौक, सरदार वल्लभभाई पटेल, नवीन सातारा, दगडी पूल, जामनेर रोड, अहिल्यादेवी विद्यालय, आठवडे बाजार, मरिमाता मंदिर, जामा मशीद, सराफ बाजार, मॉडर्न रोड, डॉ.आंबेडकर पुतळा, जाम मोहल्ला ,खडका रोड, रजा टावर चौक मार्गे बस स्थानक रोड व बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ पथसंचलनाचा समारोप झाला. या पथसंचलनात भुसावळ बाजारपेठ पोलीस, तालुका पोलीस स्टेशन, भुसावळ शहर पोलिस ठाण्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी,गृहरक्षक दलाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.