बोरखेडा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या
रीपाइंचे विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन : पीडीतांच्या कुटुंबाला द्यावी पाच लाखांची मदत
रावेर : तालुक्यातील बोरखेडा येथे भिलाला कुटुंबातील चौघा भावंडांची हत्या करणार्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच पीडीत कुटुंबाला शासनाने तत्काळ पाच लाखांची मदत द्यावी व त्यांना राहण्यासाठी घरकुल द्यावे, अशी मागणी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकरांना निवेदनाद्वारे करण्यात आली. रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पदाधिकार्यांनी पीडीत कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.
कुटुंबाचे करावे पुर्नवसन
निवेदनाचा आशय असा की, पीडित कुटूंबास तत्काळ पाच लाखांची मदत द्यावी, कुटूंबाचे पुनर्वसन करून त्यांना स्वतःचे घर व शेती समाज कल्याण विभागामार्फत देण्यात यावी तसेच मागणी मान्य न झाल्यास 23 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. हे निवेदन रीपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस मिलींद तायडे, युवा जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे, जिल्हा सचिव प्रकाश सोनवणे, युवा कार्याध्यक्ष गिरीष तायडे, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष युवराज सोनवणे, रावेर तालुकाध्यक्ष विक्की तायडे, ग्रामीण तालुकाध्यक्ष एकनाथ गाढे, युवा तालुकाध्यक्ष कमलाकर गाढे, सतीश निकम, भीमराव तायडे, किरण ढिवरे, भिका गाढे, राहुल लहासे, नूर मोहम्मद तडवी, समाधान गाढे आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.


