वांजोळा घटनेतील आरोपीला भर चौकात फाशी द्या
जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांचे पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन
भुसावळ : तालुक्यातील वांजोळा येथे साडेसहा वर्षीय अल्पवयीन मूकबधीर बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना 14 रोजी घडली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्यास भर चौकात फाशी द्यावी, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अॅड.उज्वल निकम यांची नेमणूक व्हावी
निवेदनाचा आशय असा की, वांजोळ्यातील अत्याचाराच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, सरकारी यंत्रणेचा आरोपींना धाक राहिला नसल्यानेच अशा घटनात समाजात घडत असल्याने महिलांना जीवन असुरक्षित वाटू लागले आहे. दिशा विधेयक राज्यात लागू करावे व आंधप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हा कायदा लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ई मेलद्वारे 15 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.


