जिल्हावासीयांना दिलासा : कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट : रविवारी आढळले 60 बाधीत
जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 51 हजार 889 वर : आतापर्यंत 48 हजार 766 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत 1241 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 60 रुग्ण आढळले तर गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा आकडा कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 51 हजार 889 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 48 हजार 766 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 241 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 193 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 06
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 03
अमळनेर 12
चोपडा 01
पाचोरा 00
भडगाव 04
धरणगाव 01
यावल 03
एरंडोल 00
जामनेर 12
रावेर 06
पारोळा 04
चाळीसगाव 04
मुक्ताईनगर 03
बोदवड 00
अन्य जिल्हा 05


