बोरखेडा हत्याकांडातील आरोपींविरुद्ध अत्याचार व पोस्कोच्या कलमात वाढ


विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची पत्रकार परीषदेत माहिती

रावेर : बोरखेडा रोडवरील शेतात आदिवासी भिलाला कुटुंबातील चार भावंडाच्या झालेल्या हत्याकांड प्रकरणी अटकेतील आरोपींविरुद्ध अत्याचार तसेच पोस्कोच्या कलमात वाढ करण्यात आली असून तपास जलद गतीने सुरू असल्याची माहिती नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी रविवारी रावेरात सायंकाळी आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

यांची होती उपस्थिती
या पत्रकार परीषदेला पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तपास अधिकारी कुमार चिंथा, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक मनोज वाघमारे उपस्थित होते.

परीस्थितीजन्य पुराव्यावरून कलमात वाढ
विशेष पोलिस महानिरीक्षक व पोलिस अधीधक्षक म्हणाले की, हा गुन्हा प्रचंड संवेदशील आहे. यासाठी विविध पथके गठित करण्यात आले असून परीस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावरुन या गुन्हात बलात्कार व पोस्कोच्या कलमात वाढ करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात नव-नवीन माहिती समोर येत असून त्या दिशेने तपास करून गुन्हा अतिशय संवेदशील असल्याने क्रॉस व्हेरीफीकेशन करण्यात येत आहे. या गुन्हा प्रकरणात ताब्यात घेतलेले आरोपी हे अल्पवयीन असून इतर संशयीतांचीदेखील चौकशी सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !