राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय खडसे घेतील : शरद पवार


उस्मानाबाद : भाजपाकडून गेल्या चार वर्षांपासून डावलण्यात आलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहेत मात्र खडसेंनी आपली भूमिका स्पष्ट करताना जे करेल ते सर्वांना सांगून करेल, असे सांगत मी अद्याप भाजपातच असल्याची भूमिका मांडली आहे तर दुसरीकडे उस्मानाबाद दौर्‍यावर आलेले खासदार शरद पवार यांनी माध्यमांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारले असतो ते म्हणाले की, एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसे यांचे भाजपच्या उभारणीत मोठं योगदान असल्याचे सांगितले.

सदस्यत्वाचा न दिलेला राजीनामा अन् खडसेंना मनस्ताप
रविवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर आल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र राजीनामा आला नसल्याचे सांगितले तर खडसेंनी देखील राष्ट्रवादीत प्रवेशाच्या मुहूर्ताच्या माध्यमांनी पेरल्याचे सांगितले व माध्यमेच अधिक याबाबत चर्चा घडवून आणत असल्याचे खडसे म्हणाले.
ऑडिओ क्लीप व्हायरल



त्या क्लीपनंतर वाढली अधिक चर्चा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांना मुंबईत बोलावत खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती व त्यानंतर वरणगावच्या एका भाजपा कार्यकर्त्याने खडसेंशी साधलेल्या संवादाची क्लीप व्हायरल झाल्यानंतर खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा वेगात सुरू झाली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !