फैजपूरात शेतकरी विधेयकाविरुद्ध स्वाक्षरी मोहिम
फैजपूर : केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयकाला विरोध करणेसाठी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते रविवारी फैजपूर शहरातली सुभाष चौकात स्वाक्षरी मोहिमेमला प्रारंभ करण्यात आला. केंद्राने शेतकर्यांच्या विरोधात कृषी विधेयक मंजूर करून शेतकर्यांची दिशाभूल केली असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, कृउबाचे माजी सभापती केतन किरंगे, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, काँग्रेस गटनेता कलिम खान मन्यार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, शिवसेनेचे प्रभाकर चौधरी, बबन तायडे, रामराव मोरे, काँग्रेस शहराध्यक्ष रीयाज मेंबर, मोहसीन खान, मुकेश हंसकर तसेच शेतकरी मधुकर चौधरी, लिलाधार वसंत चौधरी, अशोक बोरोले, मयूर बोरोले, किरण बोरोले, अनिल भोळे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.


