फोन-पे वरून कॅशबॅकची ऑफर देत एक लाखात गंडवले
बोदवड : फोन-पे वरून कॅशबॅक ऑफर असल्याचे सांगत बोदवडमधील तरुणाची 98 हजार 731 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा उाखल करण्यात आला. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुसर्या मजल्यावरील अनमोल विमा सेवा केंद्रात खाजगी नोकरीस असलेल्या रवींद्र रमेश पाटील (20 रा.प्रभाग क्रं.10 महादेव मंदिराजवळ, बोदवड) या तरुणाला फोन-पे वरून कॅशबॅक ऑफर असल्याचे सांगत 9934823620 व 7319998878 संबंधिताने कॉल करीत संपर्क साधला व बँक खात्यातून 98 हजार 731 रुपये परस्पर काढून फसवणूक केली. 19 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बोदवड पोलिसात संबधित मोबाईल क्रमांक धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक गजानन काळे करीत आहेत.

