लग्नाच्या आमिषाने अत्याचार : नेवासाच्या फौजदारासह चौघांविरुद्ध गुन्हा
चाळीसगाव : मेहुणबारे येथील तरुणीची लग्नाच्या आमिषाने फसवणूक करीत अत्याचार केल्याप्रकरणी नेवासा येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक समाधान वसंत भाटेवाल व त्यांचा भाऊ अरुण भाटेवाल, वडील वसंत भाटेवाल व पप्पू कुमावत यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी उपनिरीक्षकांचे वडील वसंत भाटेवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर तिघांचा कसून शोध सुरू आहे. 21 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार, फौजदार समाधान भाटेवाल यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 29 जुलै 2018 रोजी चाळीसगावात बोलावून जहागीरदारवाडी परीसरातील मित्राच्या खोलीवर नेत लग्नाचे आमिषाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक मयूर भामरे करीत आहेत.

