चोपडा आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द


चोपडा : चोपडा तालुक्याच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश नंदुरबारच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने काढल्याने जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निकालाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यात येईल, अशी माहिती सोनवणे यांच्यातर्फे त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिली आहे.

टोकरे कोळी जमातीचा दावा झाला नाही सिद्ध
आमदार लता सोनवणे यांनी जात प्रमाणपत्र समितीला सादर केलेल्या कागदपत्रानुसार त्यांनी टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध न झाल्याने त्यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचा दावा, अवैध ठरविण्यात येत असल्याचे समितीने म्हटले आहे तर जळगाव प्रांताधिकार्‍यांनी निर्गमित केलेले टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !