साळशिंगीचा अल्पवयीन विद्यार्थी बेपत्ता : अपहरणाचा गुन्हा
बोदवड- तालुक्यातील साळशिंगी गावातील रहिवासी तथा बोदवडमधील न.ह.रांका हायस्कूलचा नववीचा विद्यार्थी हरवल्याप्रकरणी बोदवड पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर शांताराम पवार (15) असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 24 ऑगस्टला गोकुळाष्टमीच्या सुटीनिमित्त ज्ञानेश्वर साळसिंगीत आला तर बोदवडमधील वस्तीगृहात जाण्यासाठी तो 26 ऑगस्टला दुपारी तीन वाजता साळशिंगीवरून निघाला मात्र शाळा वा वसतिगृहात पोहोचलाच नाही. शोध घेवूनही तो न आढळल्याने वडील शांताराम सुपडू पवार यांनी 5 सप्टेंबरला बोदवड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे ज्ञानेश्वर दीड महिन्यापूर्वी देखील असाच बेपत्ता झाला होता. ज्ञानेश्वर हा डाव्या पायाने दिव्यांग असून तपास एएसआय विजेश पाटील करीत आहेत.