भुसावळातील अट्टल दुचाकी चोरटा तीन दुचाकींसह जाळ्यात

जळगाव एमआयडीसी पोलिसांची गोपनीय माहितीद्वारे कारवाई


जळगाव (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी भुसावळातील दुचाकी चोरट्याला चोरीच्या तीन दुचाकींसह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण 95 हजार रुपये किंमतीच्या तीन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. मोहम्मद शहा अस्लम शहा (भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे

जळगावातून लांबवल्या दुचाकी
जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातील मनोज शंकराव गरुड यांच्या मालकीची सीबी शाईन मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 डी.डी. 8323) ही 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजता त्यांचा मुलगा प्रथम गरुड याने एमआयडीसी जळगाव येथील व्ही-सेक्टरमधील लिड्स इंडस्ट्रीज कंपनीच्या परिसरात उभी केली होती. सायंकाळी सुमारे यहस वाजता काम आटोपून परत आल्यानंतर संबंधित मोटारसायकल तेथे दिसून आली नाही. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज गरुड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.




तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी जाळ्यात
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीष पाटील, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी आणि योगेश घुगे यांचा पथकात समावेश करण्यात आला. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढून भुसावळ तील मोहम्मद शहा अस्लम शहा याला अटक केली. आरोपीकडून 25 हजार रुपये किंमतीची सीबी शाईन मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 डी.डी. 8323) हस्तगत करण्यात आली. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील आणखी एका गुन्ह्यातील 20 हजार रुपये किंमतीची क्रमांक नसलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकलही जप्त करण्यात आली. याशिवाय 50 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची सीटी 100 मोटारसायकलही पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीष पाटील, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, योगेश घुगे आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !