कजगावातील पाच वर्षीय बालकाची दोन दिवस तपस्या
कजगाव : गावातील जैन स्थानकात पूज्य महासतीजी विमलेशप्रभाजी म.सा. प.पु.यशप्रभाजी म.सा. व प.पु.भक्तीप्रभाजी म.सा. यांचा येथे चातुर्मास सुरू आहे. चातुर्मास प्रारंभापासुनच येथे विविध तपस्या सुरू झाल्या आहेत. जैनांचे गेल्या आठवड्यात सुरू झालेले महापर्व म्हणजेच संवस्तरी पर्व. 27 जुलैपासुन चातुर्मास प्रारंभ झाल्यानंतर तपस्यांना (निरंकार उपवास) सुरुवात झाली. या पर्वात ज्येष्ठ पत्रकार प्रमोद ललवाणी यांचा पाच वर्षीय नातू हितांश ललवाणीने 1 व 3 सप्टेंबर रोजी दोन उपवास केले. कजगावात सर्वात कमी वयाचा बालक हितांश ठरला आहे. त्याच्या श्रद्धेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.