हावडा लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडीच्या वेळेत बदल


भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे हावडा लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. ही गाडी संपूर्ण आरक्षित असून कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार असून कोविड नियमांचे प्रवाशांना पालन करावे लागणार आहे.

31 डिसेंबरपर्यंत गाडी धावणार
अप 02102 हावडा लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष गाडी 3 ते 31 डिसेंबरदरम्यान दर रविवारी व गुरुवारी प्रस्थान स्टेशन पासून 9.15 वाजता प्रस्थान करणार असून तिसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला 3.55 वाजता पोहोचणार आहे. अप दिशेला या गाडीला बडनेरा, अकोला व भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस हावडा उत्सव विशेष गाडी 4 ते 29 डिसेंबरदरम्यान दर रविवारी व गुरुवारी प्रस्थान स्टेशनपासून 8.35 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी हावडा येथे 3.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ, अकोला, बडनेरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !