ग्रामपंचायत कराची रक्कम परस्पर खर्च : साकेगावातील ग्रामसेवक गौतम वाढेंचे निलंबन
भुसावळ : ग्रामपंचायत कराच्या रक्कमा वसूल करून ग्रामपंचायतीच्या खात्यात भरणा न करता ही रक्कम परस्पर खर्च करून आर्थिक अनियमीतता केल्याप्रकरणी भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामसेवक गौतम आधार वाडे यांना जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी निलंबीत केले आहे. निलंबन काळात वाडे यांना एरंडोल पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले असून निलंबनाची नोंद वाडे यांच्या मुळ सेवा पुस्तकी घेण्याच्या सूचनाही आदेशात आल्या आहेत. दरम्यान, ग्रामसेवकांच्या निलंबनानंतर जिल्ह्यातील ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.

